Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

प्रतीक पवार हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांची रॅली

प्रतीक पवार हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांची रॅली

अहमदनगर (प्रतिनिधी) : प्रतीक पवार हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे व गोपीचंद पडळकर यांनी कर्जत येथील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रतीक पवारची भेट घेतली. यानंतर नगर शहरात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांनी रॅली काढली.


दोन दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या विषयावर आवाज उठवला होता. हिंदूंवर हल्ले करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता, तसेच कर्जत मध्ये जाऊन प्रतीक पवार ला भेटणार आल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज आमदार नितेश राणे व आमदार गोपीचंद पडळकर आज कर्जतमध्ये दाखल झाले.


उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती कर्जतमध्ये झाली असून नुपूर शर्मा चा फोटो डीपी ठेवला म्हणून कर्जत अहमदनगर येथील प्रतीक पवार या हिंदू तरुणावर धर्मांध लोकांनी प्राणघातक हल्ला केला. ३५ टाके पडून गंभीर जखमी असलेल्या प्रतीक पवारची केअर हॉस्पिटल सावेडी मध्ये जाऊन आमदार नितेश राणे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

Comments
Add Comment