Wednesday, July 17, 2024

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. ७ ते १३ ऑगस्ट २०२२

संधीचा योग्य फायदा घ्या
मेष –आपणास कामाच्या अनेक संधी येणार आहेत. संधीचा योग्य फायदा घ्या. तुमच्या वा कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. मिश्र ग्रहमान असणार आहे. मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक वाद असतील, तर निकाल आपल्या बाजूने लागेल. नोकरीमध्ये पगारवाढीची शक्यता आहे. सुखात वाढ होणार आहे. आरामदायी वस्तूंवर खर्च होणार आहे. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. धर्म व अध्यात्म यामध्ये रुची घेणार आहात. भागीदारीमधील लाभ मिळणार आहे. शुभ वार्ता मिळतील.
कामाचा गौरव होईल
वृषभ – हा सप्ताह आपणास चांगला आहे. आपल्या कामाचे श्रेय आपणास मिळणार आहे. तुमच्या कामाचा गौरव होईल. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहात. नातेवाइकांची चांगले संबंध असणार आहेत. स्वतःच्या क्षमतेवर आपला विश्वास असणार आहे. उच्च राहणीमानाचे जीवन जगण्याची शक्यता आहे. दूरचे प्रवास होण्याची शक्यता आहे. धार्मिक कामे होतील. आपल्या कामामध्ये काय फायदा होणार आहे, काय चांगले होईल याकडे अधिक लक्ष देणे फायद्याचे ठरेल. काही आरोग्याचे मुद्दे समोर येतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
आर्थिक व्यवहार जपून
मिथुन – हा कालावधी आपणासाठी अनुकूल असणार आहे. आपल्यामध्ये अत्यंत सकारात्मक ऊर्जा राहणार आहे. आपण अनेक व्यक्तींशी चांगले संबंध जोडाल. यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होणार आहे. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद, यश घेऊन येईल. आपण आपल्या घराकडे अधिक लक्ष द्या व काळजी घ्या. कुटुंबातील समस्यांचे चांगल्या तऱ्हेने निवारण करा. कोणतेही लहान-मोठे निर्णय शांतचित्ताने घेतल्यास ते फायदेशीर ठरतील. आर्थिक व्यवहारांबद्दल सतर्क राहा. आर्थिक स्थैर्याचा काळ आहे. अचानक धनलाभ संभवतो.
सावधानता बाळगा
कर्क – तुमच्या कारकिर्दीत प्रगती होणार आहे. तुमची काम करण्याची तयारी असणार आहे. तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. गुंतवणूक मात्र हुशारीने करा. कोणतेही लहान-मोठे निर्णय पूर्ण विचारांती घेणे गरजेचे आहे तसेच नवीन गुंतवणूक करताना जाहिरातींना किंवा कोणाच्या गोड बोलण्याला बोलू नका. सावध राहणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. सरकारी किंवा सार्वजनिक जीवनात अधिकाराचे वजन वापरू शकाल.
पत-प्रतिष्ठा वाढेल
सिंह – या कालावधीमध्ये आपण आक्रमक होऊ नका. मित्रांसोबत वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरातले व्यवहार अगदी सुरळीत राहणार आहेत. तुमची जबरदस्त इच्छा आणि ऊर्जा ही उच्च प्रकारची राहणार आहे. उच्चभ्रू वर्गापासून तुम्हाला मदत मिळणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. शत्रूंना तुम्ही चांगले उत्तर देऊ शकणार आहात. आध्यात्मिकतेकडे ओढा राहील.
उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल
कन्या – नवीन मित्र व नाती जोडली जाणार आहेत. त्यांच्यापासून आपणाला लाभ होणार आहेत. नव्याने व्यवसाय सुरू करण्याचे विचार असतील. पूर्णपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्या व्यापार व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पदावरील प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळणार आहे. सर्वांगीण समृद्धीचा कालावधी आहे. आपले विचार समतोल असू द्यावेत. आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रिय असणार आहात. आपणास बढतीची अपेक्षा असेल, तर ती होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतो.
व्यवसायात चांगले यश मिळेल
तूळ – व्यापार व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. त्याच्यात चांगली उंची गाठणार आहे. ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळणार आहे. आपला व्यवसाय-धंदा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्यात यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. नोकरीची चांगली संधी मिळू शकते किंवा पगारवाढ होऊ शकते. सोन्याची किंवा जागेची खरेदी करू
शकता. स्वतःला व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे.
आव्हानांवर मात कराल
वृश्चिक – तुमच्यासमोरील आव्हानांना मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लावणार आहात. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहा. यश लाभेल. नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील. उत्पन्नाचे एकापेक्षा अनेक स्रोत वाढणार आहेत. पण त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. चैनीच्या वस्तूंवर खर्च होणार आहे. अनावश्यक खर्च टाळणे आपल्या हातात आहे. हा कालावधी मिश्र घटनांचा राहील. घरामध्ये धार्मिक कार्य होतील.
नवनवीन संधी मिळतील
धनु – तुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. आध्यात्मिक जगामध्ये जास्त रमणार आहात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश चांगले मिळणार आहे. तुमची कष्टाची तयारी असेल, तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. आपणास यश निश्चित मिळणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळतील. व्यवसाय-धंद्यात नवीन कराराच्या संधी मिळतील. आर्थिक आलेख उंचावेल. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. घरातील तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील. घरी किंवा कार्यक्षेत्रामध्ये होणारे बदल आपणासाठी चांगले असणार आहेत.
आर्थिक आलेख उंचावेल
मकर – कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्त्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास यशस्वी होणार आहात. त्यातून आपणास आर्थिक लाभ होणार आहे. दीर्घकाळ रखडलेले जमीन-जुमले यांचे व्यवहार गतिमान होऊन मार्गी लागतील. त्यातून भरघोस आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक निश्चित वाढणार आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असेल. महत्त्वाची कामे करताना सकारात्मक राहा. मानसिक स्थैर्य चांगले असेल. जमीन किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.
शत्रूचा पराजय होईल
कुंभ – तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. आपल्या कामात अडचणी आल्या तरी त्यावर व्यवस्थित मात होईल. तुम्ही शत्रूचा पराजय करण्यास यशस्वी होणार आहात. आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर व व्यवहार कुशलतेने आपल्या शत्रूंवर विजय मिळवाल. मात्र आपल्या बोलण्यावर व वागणुकीवर नियंत्रण हवे. नोकरीमध्ये चांगला कालावधी आहे. कायदेशीर बाबीमध्ये यशदायी कालावधी आहे. आपल्या विचारांमध्ये विश्वास असणार असल्याने कामे सुरळीत होणार आहेत. बढती मिळण्याची शक्यता आहे.
सुख-समृद्धी लाभेल
मीन – आताचा काळ आपणास अत्यंत समृद्धीचा काळ असणार आहे. या कालावधीचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकत नाहीत. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी आपण खर्च कराल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. नोकरीमधील उत्पन्न वाढेल. तुमची प्रगती निश्चित आहे. उद्योग व्यवसायात आपणास यश मिळणार आहे. नोकरीमध्ये अनुकूल कालावधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -