बर्मिंगहम : बॉक्सिंगमध्ये आजच्या दिवसाचे पहिले सुवर्णपदक आले. भारताच्या नितूने ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेसझ्तानवर ५-० असा विजय मिळवून गोल्ड मेडल जिंकले.
हरयाणाच्या या २२ वर्षीय बॉक्सिंगपटूने अल्पावधीतच या खेळात आपला ठसा उमटवला. २०१६मध्ये तिने युवा राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर २०१७मध्ये बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
२०१८मध्ये तिने चार सुवर्णपदके जिंकली. त्यात आशियाई युवा अजिंक्यपद, युवा राष्ट्रीय स्पर्धा. गोल्डन ग्लोव्ह्ज स्पर्धा व युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांचा समावेश होता. २०२२मध्ये तिने बल्गेरियातील स्पर्धा जिंकली.