ठाकरे कुटुंबीयांविरोधात बोलणाऱ्या आमदारांचे शिंदेंनी टोचले कान

मुंबई : बंडखोरीनंतर ठाकरे कुटुंबीयांबाबत आक्रमक न होण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊनही काही आमदार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तुटून पडत असल्याची बाब शिंदे यांनी गांभीर्याने घेतली आहे. ‘नको त्या विषयात नको तेवढे बोलू नका,’ असे बजावत आपल्या गटातील आमदारांचे कान शिंदे यांनी टोचल्याचे सूत्रांकडून समजते.


शिवसेनेत बंड पुकारल्यापासून शिवसेनेतील नेते आणि बंडखोरांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातून या दोन्ही गटांतील वाद टोकाला गेल्याचे दिसत आहे. परंतु बंडानंतरच्या पहिल्या काही दिवसांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काहीही न बोलण्याची भूमिका शिंदे यांनी घेतली होती. ठाकरे यांच्याबाबत वैयक्तिक टीका केली जाणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही जाहीर केले होते. तरीही, आदित्य हे राज्यात फिरत असताना बंडखोरांवर हल्लाबोल करीत आहेत. त्यातही, ‘गद्दारांनो, राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा,’ असे आवाहन आदित्य करीत आहेत.


त्यावरून आदित्य आणि काही बंडखोर आमदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. त्यातून ठराविक आमदार तर आदित्य यांना ‘टार्गेट’ करीत आहेत. त्याआधी शिंदे यांना सुरक्षा पुरविण्यावरूनही काही आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आपले मोजके आमदार हे रोज वादग्रस्त बोलत असल्याच्या तक्रारी काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर शिंदे यांनी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आमदारांचे कान टोचल्याचे समजते. शिंदे यांच्या शब्दापलीकडे नसलेले हे आमदारही आता ‘बॅकफूट’वर येण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

मुंबई उपनगरीय रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक

मध्य व पश्चिम रेल्वेवरील सेवांमध्ये बदल मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल व

ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन

नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा