Tuesday, March 25, 2025

मोती मोती

प्रा. सुमती पवार

टप टप टप टप पाऊसधारा
त्यातच सुटला सुसाट वारा …
सुसाट वारा गगनी गेला
काळे ठोकळे हलवून आला…

गडगड गडगड आले खाली
धरणीमाता मोती झेली…
पदर झाला चिंबच चिंब
थरथर थरथर पक्षी लिंब…

कुहू कुहू कोकीळ भारद्वाजही
डौलदार तो नाचे मोरही …
कडकड कडकड बिजली चाबूक
नभात पसरे प्रकाश आपसूक…

मोती… मोती मोती …मोती
सान सान ते तळी डुंबती…
थयथय थयथय नर्तन चाले
सृष्टी सारी हाले डोले…

नयनमनोहर असा सोहळा
फुटले अंकुर गेली अवकळा…
अणुरेणू ते निघती न्हाऊन
सहस्र हस्ते करतो पावन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -