वाडा (वार्ताहर) : या वर्षी रक्षाबंधनाला महागाईची झालर लागणार आहे. मजुरीचे दर वाढल्याने राख्यांच्या किंमतीत सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. त्यामूळे गत वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांसाठी जादा पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. परंपरागत देव राख्या सोडल्या तर इतर राख्यांची संकल्पना कालबाह्य झाली आहे. यामुळे बाजार पेठेत फमच्या राख्या आता दिसत नाहीत. यामुळे फमच्या साध्या राख्यांची निर्मिती थांबली आहे. त्यांची जागा आता रेशीम बंधनाच्या नाजूक धाग्याने घेतली आहे.
राखी जितकी छोटी तितके जास्त ग्राहक त्याकडे आकर्षिले जातात. यामुळे दिसायला छोट्या असणाऱ्या राख्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रिला आल्या आहेत. यामध्ये खास करून मोत्यांच्या राख्यांना अधिक मागणी आहे. विविध कौशल्याचा वापर करीत या राख्या मोत्यांमध्ये गुंफण्यात आल्या आहेत. त्याला सुयोग्य कला कूसर केलेल्या राख्यांना सर्वाधिक मागणी आहे. या सोबत रुद्राक्ष आणि प्लास्टिकच्या विविध डिझाइनने तयार केलेल्या राख्यांना मागणी आहे. या शिवाय छोट्या मुलींसाठी बँगल राखी आली आहे.
यामध्ये मुलींच्या बांगड्याना बांधला जाणारा लांब राखीचा धागा असतो. याशिवाय रक्षाबंधनाचे खास ताटही बाजारात आले आहे. यातून रक्षाबंधनाच्या उत्सवाला अधिक देखणे करण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून केला आहे. चायनीज स्टोन राख्या थांबल्या आहेत. करोनापासून बाहेरच्या राख्या कमी झाल्या असून त्यांची जागा आता भारतीय राख्यांनी घेतली आहे.
गतवर्षी राखी पैर्णिमेला चांगला व्यवसाय झाला होता. यावर्षी बाजारात ग्राहकांची मंदी आहे. दर वाढल्याने खरेदीसाठी उत्साह दिसत नाही. मात्र पुढे ग्राहक वाढतील अशी अपेक्षा आहे. -श्रीकांत भोईर, व्यवसायिक
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…