बर्मिंगहम : भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्यांनी इंग्लंडचा ४ धावांनी पराभव करत भारतीय महिला थेट फायनलमध्ये पोहोचल्या आहे. भारतीय संघाने रौप्य पदक निश्चित केले असले तरी त्यांच्याकडून आता सुवर्णाची अपेक्षा असणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यात भारतीय संघाने फायनल गाठून इतिहास रचला. आधी फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले, जे पार करताना इंग्लंडचा संघ २० षटकात १६० धावाच करु शकला आणि भारत विजयी झाला.
भारताने इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडला २० षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून स्मृती मानधना दमदार खेळी करत ३२ चेंडूत ६१ धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने ४४ धावांची झुंजार खेळी करत भारताला २० षटकात १६४ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर गोलंदाजीत दिप्ती शर्मा, स्नेह राणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.