रंजना मंत्री
आ हाहा! काय तो पाऊस आणि काय तेव्हा मिळणारी बटाटेवड्याची लज्जत! मंडळी तोंडाला पाणी सुटले ना! आजच्या लेखात आपण पाहणार आहोत तेच बटाटेवडे तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाबद्दल. स्वयंपाकात नेमके कोणते तेल किती व कसे वापरावे हे प्रश्न आपल्याला पडतात. जाहिरातींमुळे आपला गोंधळ आणखी वाढतो. म्हणूनच ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन तेलाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, कन्झ्युमर चाॅइस या ग्राहक संघटनेकडून राईसब्रान, सनफ्लॉवर व शेंगदाणा तेलाच्या काही ब्रॅन्डसचे केलेले तुलनात्मक परीक्षण, या वेबसाइटवर नोंदवलेले आढळून आले. हे परीक्षण, फुड सेफ्टी स्टॅण्डर्ड कायद्यातील तरतुदीनुसार तसेच ॲगमार्क व इन्डियन स्टॅण्डर्ड मानकाप्रमाणे, दिल्ली येथील NABL ह्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करण्यात आले आहे.
तेल हे ग्लिसरीन व फॅटी ॲसिड यांचे मिश्रण आहे. स्वयंपाक करताना गरम भांड्याची उष्णता पदार्थापर्यंत पोहोचवणारं माध्यम म्हणजे तेल. तेलामुळे फोडणीचा खमंगपणा, मसाल्याची चव व तिखटपणा पदार्थात उतरतो. मॅरिनेशन करताना वापरलेले मसाले पदार्थात मुरवणं किंवा पदार्थातील पाण्याचे प्रमाण कमी करून पदार्थ टिकाऊ, खुसखुशीत व स्वादिष्ट बनवणं हे तेलामुळे शक्य होतं. तेलामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तेलात विरघळणारी अ, ड जीवनसत्त्वे शरीरात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम तेल करत.कन्झ्युमर चॉइस संघटनेकडून तेलाचे परीक्षण करण्यासाठी दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकत्ता या शहरातील वेगवेगळ्या रिटेलर्सकडील एक लिटरच्या पाॅलीथीन पॅकेटमधील तेलाचे नमुने गोळा करण्यात आले. आवश्यक त्या सर्व प्रकारच्या परीक्षणातून तिन्ही ब्रॅण्डच्या तेलांचे गुणधर्म, हलकेपणा, घनता, पारदर्शकता, रंग, वास, चव हे आवश्यकतेनुसार असल्याचे सिद्ध झाले. शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे, पोषणमूल्य हे या सगळ्या ब्रँड्सच्या तेलामध्ये टिकून असल्याचे आढळून आले. या ब्रँड्सची तेले अँटीऑक्सिडंट असून, ट्रान्स फॅट, जंतुनाशके व विषारी घातक पदार्थ विरहीत तसेच आर्जिनिमोन व मिनरल ऑईलची भेसळ विरहीत असल्याचे सिद्ध झाले.
राईसब्रान तेल…
राईसब्रान तेलाच्या अकरा ब्रॅन्डसच्या तुलनात्मक परीक्षणात ‘हेल्दी हार्ट’ हा ब्रॅन्ड सर्वोत्तम, इतरांपेक्षा थोडा महाग आढळला. त्या खालोखाल धारा, राईसेला, नेचर पायर साथी, राईसो हे ब्रॅन्ड, तर त्यानंतर येणारे फॉर्च्यून, तांदूळ, पोर्ना, ओरिसा हे ब्रॅन्ड आहेत.
गुणात्मक किंमत हेल्दी हार्ट, साथी, प्रिया या ब्रॅन्डसची तर सेन्सरी टेस्ट साथी ब्रॅन्डची ठरली. मुफा (मोनो अनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड) गुणधर्म प्रिया ब्रॅन्डमध्ये जास्त तर नेचर प्युअरमध्ये कमी. पुफा (पाॅली अनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड) गुणधर्म नेचर प्युअरमध्ये जास्त, तर पोर्नामध्ये कमी प्रमाणात आढळून आले. तांदळाच्या भुसापासून बनवण्यात येणारे राईसब्रान तेल रिफांईड करूनच वापरावे लागते. सुवास विरहीत अशा या तेलाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो व म्हणून हे तेल तळण्यासाठी उत्तम. या एकमेव तेलातून ‘ओरिझेनॉल’ नैसर्गिक रूपात भरपूर प्रमाणात मिळत. ज्याचा फायदा शरीरातील उच्चरक्तदाब, कोलेस्टेरॉल मर्यादित ठेवणे, हाडांची ठिसूळता व यकृताची क्षमता सुधारण्यासाठी होऊ शकतो. पोर्नामध्ये ‘ओरिझेनॉल’ सर्वात जास्त म्हणजे १.८% तर राईसोमध्ये १.२५ % आणि इतर ब्रॅन्डमध्ये किमान आवश्यकतेनुसार म्हणजे १% आढळलं.
सनफ्लावर तेल…
सूर्यफुलाच्या बियापासून बनवण्यात आलेल्या या तेलात ई विटामिन भरपूर प्रमाणात असते. उच्च तापमानातही यातील पोषणमूल्ये टिकून राहतात म्हणून हे तेल तळण्यासाठी चांगले मानले जाते.
बारा ब्रॅन्डस तेलाच्या परीक्षणातून थोड्याफार फरकाने जेमिनी, इमामी यांचा प्रथम क्रमांक त्या खालोखाल धारा फोरचुन, डालडा, गोल्ड विनर व त्यानंतर फ्रेश ॲन्ड प्युअर, फ्रिडम व नेचर फ्रेश, पतांजली, स्विकार, सनड्राॅप असे ठरले. गुणात्मक किंमत जेमिनी व इमामी तेलाची तर, कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने आवश्यक असलेले मुफा गुणधर्म कमी जास्त फरकाने धारा, स्विकार, सनड्राॅप, तर पुफा गुणधर्म इमामी व स्विकार यात आढळून आले.
शेंगदाणा तेल…
शेंगदाणा तेलात ई विटॅमिन, ओमेगा, मुफा व पुफा असे आरोग्यासाठीचे पोषक घटक असतात. बारा ब्रॅन्डसच्या परीक्षणातून फिल्टर्ड शेंगदाणा तेलापैकी जेमिनी, फ्रेश ॲन्ड प्युअरनंतर अंकुर, पोर्ना, धारा, पतांजली व गुलाब तर रिफांईड तेलापैकी डालडा, नेचर फ्रेश, गगन, फोरचुन व पोस्टमन असा या ब्रॅन्डसचा क्रम लागला. गुणात्मक किंमत फिल्टर्ड तेलात जेमिनी, फ्रेश ॲन्ड प्युअर तर रिफाईंड तेलात नेचर फ्रेश या ब्रॅन्डची चांगली ठरली.
शेंगदाणा तेल बनवण्याच्या प्रक्रियेत रिफांईडपेक्षा फिल्टर्ड शेंगदाणा तेलात त्यातील सर्व पोषणमूल्ये टिकून राहतात, म्हणून फिल्टर्ड शेंगदाणा तेल जास्त आरोग्यदायी असतं. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात फिल्टर्ड तेल व तळण्यासाठी रिफाईंड वापरणं उत्तम.सर्व तेलाचे ब्रॅन्डस पर्यावरणाच्या दृष्टीने ECOMARK मानकानुसार योग्य तसेच त्यांचे पॅकिंगही तेल टिकून राहण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य असल्याचे आढळून आले. तेलाचे मोठे कॅन घेतल्यास ते काळजीपूर्वक थंड जागेत ठेवून कालावधीच्या आधी संपेल याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक प्रकारच्या तेलात काही चांले गुणधर्म असल्याने सर्व तेले आलटून पालटून वापरणे श्रेयस्कर. रस्त्यावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवरील पदार्थात आरोग्याला अपायकारक ट्रासफॅट मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे बटाटेवडेच पण घरी बनवलेले खाणे कधीही चांगले.तेलाची निवड करताना ग्राहकांना या माहितीचा उपयोग होईल. परिक्षण न केलेले, सुटे तेल, स्वस्त आहे म्हणून न घेता आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी ब्रॅन्डेड का घ्यावे हेही लक्षात येणार आहे. त्यामुळेच ग्राहकांचा निवडीचा व सुरक्षिततेचा हक्क यातून जपला जाईल.
mgpshikshan@gmail.com
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…