मुंबई : चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ५.४० टक्क्यांवर गेला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सरकारी ते खाजगी बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जाचे व्याजदर वाढणार असून, कर्जदारांचा हप्ता वाढणार आहे.
याआधीही ४ मे आणि ८ जून २०२२ रोजी आरबीआयने रेपो रेटमध्ये एकूण ९० बेसिस पॉईंटची वाढ केली होती, त्यानंतर बँक ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर ०.९० टक्क्यांवरून १.१५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. त्यानंतर आता आरबीआयनेदेखील रेपो दरात पुन्हा वाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्वेच कर्जांचे हप्ते वाढणार आहे.
आरबीआयने रेपो दर वाढवण्याच्या निर्णयानंतर गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून बँकांना दिलेली कर्जे महागणार असून, महागड्या कर्जाचा सर्वात मोठा फटका अशा लोकांना सहन करावा लागेल ज्यांनी अलीकडच्या काळात बँक किंवा गृहनिर्माण संस्थांकडून गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले आहे.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…