Friday, June 13, 2025

रेपो दरात वाढ : होमलोनसह सर्व कर्ज महागणार

रेपो दरात वाढ : होमलोनसह सर्व कर्ज महागणार

मुंबई : चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ५.४० टक्क्यांवर गेला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर सरकारी ते खाजगी बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जाचे व्याजदर वाढणार असून, कर्जदारांचा हप्ता वाढणार आहे.


याआधीही ४ मे आणि ८ जून २०२२ रोजी आरबीआयने रेपो रेटमध्ये एकूण ९० बेसिस पॉईंटची वाढ केली होती, त्यानंतर बँक ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर ०.९० टक्क्यांवरून १.१५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​होते. त्यानंतर आता आरबीआयनेदेखील रेपो दरात पुन्हा वाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्वेच कर्जांचे हप्ते वाढणार आहे.


आरबीआयने रेपो दर वाढवण्याच्या निर्णयानंतर गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून बँकांना दिलेली कर्जे महागणार असून, महागड्या कर्जाचा सर्वात मोठा फटका अशा लोकांना सहन करावा लागेल ज्यांनी अलीकडच्या काळात बँक किंवा गृहनिर्माण संस्थांकडून गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >