Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडी

राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन छेडले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला.

दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतले. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली.

काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Comments
Add Comment