डॉ. अनिल पचनेकर
देशात थैमान घालत असलेली महामारी कोविड १९ सारख्या काळात अनेक मोठ्या लहान वैद्यकीय संघटनांनी मोलाचे कार्य केले आहे. वैद्यकीय सेवा नियोजन व कोविड नियंत्रणाचे काम हाती घेऊन संबंध महाराष्ट्रातील डॉक्टर्संना वेळोवेळी सोबत घेऊन, विविध बैठकीचे आयोजन केले. रेमडेसिव्हिर कोट, ऑक्सिजन जनमानसांपर्यंत पोहोचण्यासाठी उपाययोजना करून वैद्यकीय सेवा अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने भाजप वैद्यकीय आघाडी सतत कार्यरत असते.
गत सहा वर्षांपासून हे संघटन सामाजिक, वैद्यकीय आरोग्य व त्या क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन पूरग्रस्त क्षेत्रातील, संसर्गजन्य आजार अथवा एपिडेमिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत कुठल्याही तालुक्यात, जिल्ह्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी तयार झालेले वैद्यकीय क्षेत्रातील विशेषतः डॉक्टर्स, पॅरामेडिकल्स, दंतशल्य चिकित्सक, नर्सेस, फार्मासिस्ट, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना एका सूत्रांमध्ये बांधून एका दिशेने चालणारे हे महाराष्ट्रातील आगळे-वेगळे संघटन. कुठल्याही राजकीय अभिनिवेश न ठेवता पंतप्रधान यांचे होलिस्टिक इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे देशातील वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्यात टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
मॉडेन मेडिसिन, अर्थात अलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथिक, दंत चिकित्सा शास्त्र, पॅरामेडिकल शास्त्र, नर्सिंग, युनानी, निसर्गोपचार, योग थेरपी अशा विविध पॅथीचे एकमेकांना मधला समन्वय दृढ करण्याचे हे प्रामाणिक पाऊल. महाराष्ट्रात रचनात्मकदृष्ट्या ७ विभाग करण्यात आले. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या विभागावर रचनेमध्ये एक टीम खालोखाल जिल्हास्तरीय रचनेला एक पूर्ण कार्यकारिणी त्याखाली मंडळ रचनेमध्ये तालुकास्तरीय कार्यकारिणी अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या ६८ जिल्ह्यांतील व ६७० तालुक्यांमध्ये ही रचना आजपावेतो भक्कमपणे उभी राहिलेली आहे. या रचनेनुसार संघटनात्मक बांधणीसाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये व विभागावर सर्व प्रदेश व विभागाचे पदाधिकारी स्वखर्चाने स्वतःचा वेळ काढून या रचनात्मक कार्यासाठी प्रवास करतात. प्रत्येक पॅथीला स्वतंत्र विंग्स करण्यात येऊन त्या विंगला स्वतंत्र रचना उभी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या संपूर्ण कोविड काळामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये हेल्पलाइनद्वारे अनेक घटकांपर्यंत जाऊन फेव्हर क्लिनिक, फिरते रुग्णालय, सेवा क्लिनिक लसीकरण प्रबोधनाचे कार्यक्रम, अवेअरनेस प्रोग्रॅम स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुठल्याही शासकीय योजनेच्या मदतीशिवाय स्वखर्चाने मदतकार्य सातत्याने चालू ठेवले आहे. मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत हे संघटन जरी राजकीय असले तरी राजकारणातील सर्व वैचारिक संघर्ष बाजूला ठवून सर्व जाती-धर्मातील लोकांना अहोरात्र सेवा पुरविली. अहोरात्र वेगवेगळ्या ऑनलाइन बैठकांद्वारे देशाचे आरोग्यमंत्री, केंद्रीय आयुष्य मंत्रालय, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, राज्यातील डॉक्टर्स असलेले खासदार सोबत या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या खासदारांसोबत तसेच विधान परिषदेतील पक्षनेते icmr चे केंद्रातील सर्व अधिकारी या महाराष्ट्रातील या वैद्यकीय प्रकोष्ठ संघटनेस अहोरात्र मार्गदर्शन करत होते. या सर्व टीमला वैद्यकीय आघाडीचे मार्गदर्शक व समन्वयक डॉक्टर अजित गोपछडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत होते.
मुंबईतील धारावी विषयापासून दाटीवाटीच्या लोकवस्त्यांमध्ये घाटकोपरपासून मानखुर्द, गोवंडी, वसई, विरार सर्व झोपडपट्ट्यांपासून ते ठाण्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने हे सर्व कार्य तन्मयतेने व समर्पित भावनेतून चालू होते. विशेषतः मास स्क्रिनिंग, फेव्हर क्लीनिक, रक्त तपासणी, क्रिटिकल केअर मॅनेजमेंट, रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन व्हेंटिलेटर, इंजेक्शन्स उपलब्ध करून देणे, या संदर्भात कॉर्पोरेट रुग्णालयासोबत संपर्क करून विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णसेवकांच्या समन्वयामधून जीवदानाला अहोरात्र यज्ञ चालू होता. हे सर्व करीत असताना टाटा समूहाचे उद्योगपती यांनी सर्व वैद्यकीय प्रकोष्ठ टीमला निवासाची व भोजनाची मुंबईमध्ये ३-४ महिने सोय उपलब्ध करून दिली होती. हे करीत असताना अनेक डॉक्टर्स आजारी पडले, काही व्हेंटिलेटर्सवर जाऊन परत आले.
कोविडनंतर लसीकरण व त्या साथीचे ग्रामीण भागातील प्रबोधन कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही गाजावाजा न करता प्रत्येक जिल्ह्यात ही संघटनात्मक टीम लसीकरणाच्या यशस्वितेकरिता काम करीत आहे. याशिवाय रुग्णांना व गोरगरिबांना ब्लँकेट्स, चपल्स, कम्युनिटी किचनद्वारे जेवण, फेव्हर क्लीनिक्स व निरंतर आरोग्य तपासण्या यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
ग्रामीण भागात विशेषतः आरोग्य प्रशासनास लसीकरणाच्या कार्यात या संघटन टीमने मोलाचा हातभार लावलेला आहे. कोविड संकट काळ संपल्यानंतर हे संघटन चिरंतनपणे सातत्यपूर्ण दृष्टीने उभे राहण्याकरिता केंद्रातील नेतृत्वाने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाची सुरुवात संपूर्ण देशभरामध्ये करण्यात आली. या अभियानामध्ये महाराष्ट्रात काम करणारं स्वास्थ्य विषयातील सर्व घटकांना सोबत घेऊन भविष्यात कुठलीही आपत्ती आल्यास (आरोग्यविषयक) हे संघटन धावून जाणारे असावे ही त्या मागील संकल्पना. गत तीन वर्षांत या संघटनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ६८००० स्वास्थ्य स्वयंसेवक जोडले गेलेत, त्या माध्यमातून समाजाच्या अंतिम घटकापर्यंत उदा. कुपोषित माता व बाल संगोपन, आरोग्य संवर्धन, आरोग्य प्रबोधनाचे कार्यक्रम त्याकरिता अंगणवाडी सेविकांसोबत समन्वय साधून जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या सहकार्याने व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वखर्चाने प्रोटिन युक्त आहार, आयर्न, कॅल्शियम, मल्टीविटामिन माता व बालकांना त्या त्या अंगणवाडी केंद्रावर जाऊन सातत्याने पुरवण्याचे काम कायमस्वरूपी चालू आहे. समाजातील दुर्लक्षित घटक तृतीयपंथी भगिनी यांचे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मोफत रोग निदान शिबिरे, त्यांच्यातील आरोग्य प्रबोधनाचे कार्यक्रम, त्यांच्याशी संबंधित असलेल्या केंद्र सरकारच्या अनेक सहाय्य योजना यांची माहिती या कार्यक्रमाद्वारे त्यांना प्रदान करण्यात अली. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजी नगर या शहरांमध्ये या तृतीयपंथी भगिनींच्या आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला.
सेवाकार्य हे सातत्यपूर्ण करावयाचे असल्यास संघटनेला प्रशिक्षणाची गरज असते त्याकरिता उत्तन भायंदर येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे राज्यात काम करणाऱ्या ३०० वैद्यकीय चिकित्सक, दंत चिकित्सक , नर्सेस पॅरामेडिकल, फार्मासिस्ट व आरोग्यसेवक यांचा कोविडच्या पहिल्या लाटेनंतर लगेच एकत्रित ३ दिवसांचे मुक्कामी प्रशिक्षण वर्ग घेतले. या प्रशिक्षण वर्गात वैद्यकीय, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांची हजेरी होती व सोबतच अनेक केंद्रीय व राज्यस्तरीय नेतृत्वाचे या प्रशिक्षण वर्गास भविष्यातील संघटनात्मक मांडणीचे उत्तम मार्गदर्शन मिळाले.
महाराष्ट्रातील ४०० नामवंत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींची एकदिवसीय अभ्यास वर्ग घेण्यात आला. या वर्गात योग, रोग प्रतिकारशक्ती, वेगवेगळ्या आजारावरील मार्गदर्शन, क्रिटिकल care मॅनेजमेन्ट, प्रबोधन, लसीकरण अभियान, कुपोषण मुक्ती अभियान इत्यादी विषयांवर भविष्यात महाराष्ट्रात तळागाळापर्यंत कशा प्रकारे रचना उभी करावी यावर सखोल चिंतन करण्यात आले. विविधतज्ज्ञ डॉक्टरांचा मजबूत नेटवर्क तयार करून जनमाणसांपर्यंत सेवा व नियोजन तयार करणारे नेतृत्व डॉक्टर अजित गोपछडे व त्यांचे वैद्यकीय संघटन महाराष्ट्र शासनाला नेहमीच सहकार्य, सेवा आणि उपाययोजना देत सर्व जातीधर्माच्या पलीकडे जाऊन समाजाबद्दल आदर ठेवत कर्तव्यदक्ष असतात.