मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात २०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर २१९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या ११९०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
मुंबईत ४४६ रुग्णांची नोंद, २८८ कोरोनामुक्त
आज मुंबईत ४४६ रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या ४४६ रुग्णांमध्ये ४०८ रुग्णांना अधिक लक्षणे नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर २४८३ दिवसांवर गेला आहे.
देशात २०,५५१ नवीन कोरोनाबाधित
देशात गेल्या २४ तासांत २० हजार ५५१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात १ लाख ३५ हजार ३६४ सक्रिय कोरोनो रुग्ण आहेत.