अझरबैजान-आर्मेनिया हल्ल्यात तीन सैनिक ठार, अनेक जखमी

आर्मेनिया : अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये पुन्हा एकदा तणाव सुरू झाला आहे. नागोर्नो-कारबाख भागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला असून या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याची माहिती आहे.


एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, अझरबैजान लष्कराने ड्रोन हल्ले केल्याचा दावा नागोर्नो-कारबाखमधील लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या हल्ल्यात त्यांचे दोन सैनिक ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत.'


अझरबैजानने आर्मेनियन सैनिकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितले की, आर्मेनियन सैन्याने केलेल्या बेकायदेशीर दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या देशाचा एक सैनिक मारला गेलाय. अझरबैजानने आर्मेनियन सैनिकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असून प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात आर्मेनियन दहशतवादी मारले गेल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यात काही जण जखमीही झाले आहेत.


नागोर्नो-कारबाख या दोन देशांमधील वाद बराच जुना आहे. हे क्षेत्र सध्या अझरबैजानमध्ये आहे. २०२० मध्ये या भागात युद्धही झाले होते. या युद्धात ६६०० हून अधिक लोक मारले गेले. ६ आठवडे चाललेल्या या युद्धानंतर रशियाने मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये शांतता करार केला. तद्नंतर रशियाने या भागात दोन हजारांहून अधिक सैनिक पाठवले होते.

Comments
Add Comment

'बब्बर खालसा'ला ब्रिटन सरकारचा दणका

लंडन  : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली. या

ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी गैरसोयीचे

वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक

बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका

बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये

पाक-अफगाण सीमेवर पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती! शेकडो कुटुंबांनी सोडली घरं

कराची: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. काल (५ डिसेंबर)रात्री उशिरा चमन

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या