मुंबईत येत्या १८ ऑगस्ट पासुन पहिली इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बेस्ट बस धावणार

Share

मुंबई : मुंबईत १८ ऑगस्ट पासुन पहिली इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बेस्ट बस धावणार आहे. प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता. नव्या बसमध्ये डिजीटल तिकीटांची सोय असेल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

बेस्टकडे १५ वर्षांपूर्वी ९०१ दुमजली बस होत्या. डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता आता दुमजली बसची संख्या ४५ आहे. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात मात्र दुमजली बसची क्षमता ७४ आहे. एकमजली आणि दुमजली बसचे आकारमानही सारखेच असते. त्यामुळे या दोन्ही प्रकारातील बस रस्ता व्यापण्याचे प्रमाण सारखेच आहे. त्यामुळे दुमजली बसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे उपक्रमाकडून दुमजली बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे एसी डबल डेकर बसमधून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.

किती असेल तिकीट?

किमान अंतरासाठी (५ किलोमीटर) प्रवाशांना ६ रुपये तिकीट असणार आहे.

बसमार्ग

सुरूवातीच्या काळात बसेस पुढील तीन मार्गांवरून धावणार आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट

कुलाबा ते वरळी

कुर्ला ते सांताक्रुझ

नव्या बसची वैशिष्ट्ये

प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
नव्या बसमध्ये डिजीटल तिकीटांची सोय असेल
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

11 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

12 hours ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

12 hours ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

13 hours ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

13 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

13 hours ago