Tuesday, January 21, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत १४०० कोटींचे म्याऊ म्याऊ ड्रग्ज जप्त

मुंबईत १४०० कोटींचे म्याऊ म्याऊ ड्रग्ज जप्त

मुंबई : वरळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नालासोपारा परिसरातील औषधी निर्मिती युनिटवर छापा टाकून १,४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलो पेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केले आहे. बाजारात हे ड्रग्ज म्याऊ म्याऊ या नावाने ओळखले जाते. पालघर जिल्ह्यात असलेल्या युनिटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त झाल्याने यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर नालासोपारा येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. अलीकडच्या काळात अंमली पदार्थांबाबत शहर पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्यानुसार मेफेड्रोनवर बंदी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -