नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षांत झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सुमारे १.२९ कोटी लोकांनी नोटा हा कोणत्याही पक्षापेक्षा चांगला पर्याय असल्याचे मानले आहे. निवडणूक अधिकार मंडळ एडीआरने गुरुवारी ही माहिती दिली. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी २०१८ ते २०२२ दरम्यान झालेल्या विविध निवडणुकांमध्ये ‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) या पर्यायाला मिळालेल्या मतांचे विश्लेषण केले आहे.
या रिपोर्टनुसार, राज्य विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ला सरासरी ६४,५३,६५२ मते (६४.५३ लाख) मिळाली आहेत. एकूण, नोटाला ६५,२३,९७५ (१.०६ टक्के) मते मिळाली, असे अहवालात म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील ‘नोटा’ मतांपैकी सर्वाधिक म्हणजे ५१,६६० मते बिहारच्या गोपालगंज मतदारसंघात होती, तर सर्वात कमी नोटा मते म्हणजे १०० लक्षद्वीपमध्ये होती. तर २०२० मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लोकांनी नोटा हा पर्याय निवडला. २०२० मध्ये बिहारमध्ये ७,०६,२५२ इतकी नोटा मते पडली. तर एनसीटी दिल्लीला ४३,१०८ मते नोटा मते मिळाली. नोटाने २०२२ मध्ये सर्वात कमी मतांची टक्केवारी गाठली आहे. म्हणजेच गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी लोकांनी नोटा हा पर्याय निवडला. गोव्यात १०,६२९, मणिपूरमध्ये १०,३४९ मते, पंजाबमध्ये १,१०,३०८ मते, उत्तर प्रदेशात ६,३७,३०४ आणि उत्तराखंडमध्ये ४६,८४० मते पडली.
नोटाने राज्य विधानसभा निवडणुकीत, २०१९ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (७,४२,१३४) मते मिळवली आणि मिझोरम विधानसभा निवडणुकीत, २०१८ मध्ये सर्वात कमी नोटा मते (२,९१७) मिळवली. नोटाने छत्तीसगड राज्य विधानसभेत २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजे १.९८ टक्के मते मिळवली. तर, दिल्ली राज्य विधानसभा निवडणुका, २०२० आणि मिझोराम राज्य विधानसभा निवडणुका, २०१८ या दोन्हींमध्ये मतांच्या वाटा सर्वात कमी टक्केवारी म्हणजेच ०.४६ टक्के गाठली.
मतदारसंघनिहाय, नोटाला महाराष्ट्रातील लातूर ग्रामीण मतदारसंघात २७,५०० आणि अरुणाचल प्रदेशातील तळी मतदारसंघात नऊ मते मिळाली आहेत. अरुणाचल प्रदेशातील दिरांग, अलॉन्ग ईस्ट, याचुली आणि उत्तर अंगामी या नागालँडमधील काही मतदारसंघांमध्ये उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवार नव्हता, त्यामुळे नोटालाच मते मिळाली नाहीत.
एडीआरने सांगितले की, रेड अलर्ट मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणारे तीन किंवा अधिक उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्नभूमी असलेले आहेत, नोटाने २०१८ पासून राज्य विधानसभा निवडणुकीत २६,७७,६१६ मते (२६.७७ लाख) मिळवली आहेत. बिहारमधील २१७ रेड अलर्ट मतदारसंघांमध्ये नोटाला सर्वाधिक म्हणजे १.६३ टक्के (६,११,१२२) मते मिळाली आहेत.