शौचालय कोसळल्याने गर्भवती महिला सेफ्टी टॅंकमध्ये पडली

Share

कल्याण (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या डागडुजीकडे सततचे दुर्लक्ष केल्याने मोहने येथील लहुजी नगर या वसाहतीत शौचालयाच्या भांड्यासह कमकुवत भाग सेफ्टी टॅंकमध्ये कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रांत विधीसाठी गेलेली गर्भवती महिला या दुर्घटनेत जखमी झाली आहे.

मोहने येथील लहुजी नगर येथे सुमारे २७ वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चार पुरुषांकरिता तर चार महिला वर्गांसाठी सार्वजनिक शौचालय बांधले होते. मात्र या शौचालयांच्या देखभाल दुरुस्ती करता वारंवार निधी उपलब्ध करूनही ठेकेदार वरच्यावर मलमपट्टी करून पालिकेकडून दुरुस्तीचे बिल उकळण्यात धन्यता मानत आहे. या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कडी कोयंडे, दरवाजे नसल्याचे दिसून येत आहे

सकाळच्या सुमारास उमा रिठे (वय २२) ही गर्भवती महिला साडेसहाच्या सुमारास प्रांत विधीसाठी गेले असता अत्यंत कमकुवत झालेले शौचालयाच्या भांड्यासह भाग कोसळून सदरहू महिला सेफ्टी टॅंक मध्ये पडली. गर्भवती असलेली महिलेने कसेबसे स्वतःला सावरत सेफ्टी टॅंक मधून बाहेर पडण्याचा आटोक्यात प्रयत्न करू लागली. मात्र ती गाळात रुतल्याने तिला बाहेर पडणे मुश्किल होऊन बसले. याच दरम्यान तिने आपला जीव वाचवण्याकरता मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात करू लागली.

शौचालयाच्या नजीक राहत असणाऱ्या एका नागरिकाने तिचा आवाज ऐकल्याने घटनास्थळी जात सेफ्टी टॅंक मध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेला मोठ्या शिताफीने बाहेर काढण्यास यश संपादन करीत गर्भवती महिलेस जीवदान दिले. मात्र या दुर्घटनेत गर्भवती महिलेस इजा झाली असून तिला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या संदर्भात कल्याण डोंबिवली मनपाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांच्याशी संपर्क साधला असता आपण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवत असल्याचे यावेळी सांगितले. याबाबत लहुजी शक्ती सेनेचे कल्याण तालुका युवा अध्यक्ष श्रावण बनसोडे यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असून शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

12 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

13 hours ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

13 hours ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

13 hours ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

13 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

14 hours ago