मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे.
पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आज संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यादरम्यान पत्रा चाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावला आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने त्यांच्या नावे समन्स जारी केले आहे.
दरम्यान संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…