Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पंढरपुरात चार जणांना रेल्वेची धडक, तिघांचा मृत्यू

पंढरपुरात चार जणांना रेल्वेची धडक, तिघांचा मृत्यू

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आज पहाटे रेल्वेने चार जणांना धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघे जागीच मृत्युमुखी पडले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याचे समजते.

पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात हे चौघे मजूर रेल्वे रुळावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हलवले. अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही.

दरम्यान रुळाजवळ दारुच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारु प्यायले असावेत, असाही अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment