Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत अजूनही ११ टक्के पाण्याची तूट

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत अजूनही ११ टक्के पाण्याची तूट

मुंबई (प्रतिनिधी) : गेले काही दिवस मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांत पावसाच्या विश्रांतीमुळे पाणीसाठा स्थिरावला होता. मात्र पुन्हा झालेल्या रिमझीम पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे. मात्र तरीही अद्याप पाणीसाठ्यात ११ टक्के तूट आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पाणीसाठा स्थिरावला होता. मात्र आता पावसाची रीपरीप सुरू असून मंगळवारपर्यंत ८८.८७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. पावसाच्या रीपरीपमुळे आता पुन्हा पाणीसाठा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळीपर्यंत ८९.०६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अजूनही धरणांत ११ टक्के पाण्याची तूट आहे. सध्या सातही तलावांमध्ये १२ लाख ८८ हजार ९८० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.

मुंबईला अप्पर वैतरना, मध्य वैतरना, मोडक सागर, तुलसी, विहार, भातसा आणि तानसा तलावातून पाणी पुरवठा होतो. मुंबईला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. सध्या वर्षभराचा पाणीसाठा होण्यासाठि ११ टक्के तूट बाकी असून लवकरच मुसळधार पाऊस पडल्यास ही तूट भरून निघू शकते मात्र आज ही दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दोन वर्षातील पाणीसाठा

           दशलक्ष लिटर

२०२२ १२ लाख ८८ हजार ९८०  ८९.०६ टक्के २०२१ ११ लाख १९ हजार ९१५  ७७.३७ टक्के

Comments
Add Comment