मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेलाही केले आवाहन

  84

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे 'प्रोफाइल' फोटो बदलून डीपीवर तिरंगा लावला आहे. आकाशवाणीच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या ९१ व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा उल्लेख केला होता आणि लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा 'प्रोफाइल' फोटो बदलण्यास सांगितले होते. २ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी, आज (२ ऑगस्ट) रोजी, पंतप्रधानांनी तिरंगा त्यांचे 'प्रोफाइल' फोटो म्हणून ठेवले आहे.


यावेळी पंतप्रधानांनी एक ट्विट देखील केले आणि लिहिले की, "आज २ ऑगस्टचा दिवस खास आहे! अशा वेळी जेव्हा आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपला देश #HarGharTiranga साठी तयार आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ही एक सामूहिक चळवळ आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा असं मी आवाहन करतो."


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले होते. यासोबतच त्यांनी लोकांना 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आझादी' अमृत महोत्सव एक जनआंदोलन बनला आहे आणि लोकांनी २ ते १५ ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केल्यानंतर शहा यांचे हे आवाहन आले आहे.


केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत या महिन्यात तीन दिवस देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. कार्यक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत लोकसहभागातून घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून सरकारी आणि खाजगी आस्थापनेही यात सहभागी होणार आहेत.

Comments
Add Comment

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण