“निर्देशांक तेजीत पण सावधानता आवश्यक”

Share

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात शेअर बाजारात तेजी पहावयास मिळाली. निर्देशांक निफ्टीने या आठवड्यात १७,१७२ हा या आठवड्यात उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांकाची गती तेजीची झालेली असून दिशा अजूनही मंदीची आहे. पुढील आठवड्यासाठी अल्पमुदतीच्या चार्टनुसार १६,४०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत निफ्टीमध्ये घसरण होणार नाही. सध्या तिमाही निकाल सुरू आहेत. यात या आठवड्यात फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी सनफार्माने आपला तिमाही निकाल जाहीर केला. त्यांच्या कन्सोलीडेट नफ्यामध्ये ४३ टक्क्यांची वाढ होत तो २,०६१ करोड झाला. मागील वर्षी याच वेळी त्यांचा नफा १,४४४ करोड रुपये इतका होता. याशिवाय SBI लाइफ इन्शुरन्स कंपनीने देखील तिमाही निकाल जाहीर केला. रिपोर्ट केलेले स्टँडअलोन तिमाही क्रमांक असे आहेत. जून २०२२मध्ये निव्वळ विक्री ४,८०० कोटी झाली. मागील वर्षाचा विचार करता ती ६९ टक्क्यांनी कमी झाली, मागील जून २०२१ मध्ये १६ हजार कोटी होती. तिमाही निव्वळ नफा रु. जून २०२२ मध्ये २६२.८५ कोटी रु. वरून १७.७९% वाढला. जून २०२१ मध्ये २२३.१६ कोटी होता. इबिटा जून २०२२ मध्ये ४३९.६५ कोटी रु. झाला. मागील वर्षी पेक्षा ४% वाढला. मागील जून २०२१ मध्ये तो ४२२.६७ कोटी होता.

आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, निफ्टी १६,५०० ते १,५५०० या पातळीत काही काळ वेळ घालवू शकतात. त्यामुळे १६,५००च्या वर जोपर्यंत निफ्टी जात नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये मोठी तेजी येणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना दीर्घमुदतीसाठी गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर ठरत असते. आपण ज्या ठिकाणी पार्किंग नाही, अशा ठिकाणी जर आपली गाडी चुकीच्या पद्धतीने पार्क केली, तर आपली गाडी उचलली जाते. त्याचप्रमाणे शेअर बाजारात आपण आपला पैसा चुकीच्या शेअरमध्ये चुकीच्या पद्धतीने गुंतवला, तर तोही असाच नुकसानीच्या स्वरूपात उचलला जातो. त्यामुळे या शेअर बाजारात योग्य शेअर आणि त्या शेअरमधील आपला गुंतवणुकीचा कालावधी याचा विचार करूनच गुंतवणूक करणे अतिशय आवश्यक असते.

शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर दीर्घमुदतीसाठी घेऊन ठेवले, तर गुंतवणूकदारांना ते नेहमीच चांगला फायदा करून देत असतात. यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसिसनुसार चांगल्या कंपन्या निवडून टप्प्याटप्प्याने सातत्याने ते शेअर्स खरेदी करत राहणे हे अत्यंत आवश्यक असते. ‘सन फार्मा’ ही आज आघाडीची औषधी निर्माण करणारी कंपनी असून १९८३ला या कंपनीची सुरुवात झाली. सुरवातीला या कंपनीने मानसिक आजारावर काम करणाऱ्या केवळ ५ औषधांची निर्मिती करून कंपनीला सुरुवात केली. आज प्रामुख्याने हृदयाचे आजार, डोळ्यांचे आजार, हाडाचे आजार, किडनीचे आजार, मानसिक आजार यावरील औषध निर्मितीचे काम ही कंपनी करते. आज जवळपास २००० पेक्षा अधिक उत्पादने या कंपनीची असून या एकूण उत्पादनांपैकी ७०% पेक्षा जास्त विक्री ही बाहेरील देशांमध्ये होते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% उत्पन्न हे अमेरिकेतून येते.

१९९४ साली आय.पी.ओ.द्वारे ह्या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश झाला. भारतामध्ये आज पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या कंपनीने १९९७ मध्ये अमेरिकेतील ‘कॅराको’ ही कंपनी ताब्यात घेतली. ‘सन फार्मा’ या कंपनीने ताब्यात घेतलेली ही त्यांची पहिलीच ‘आंतरराष्ट्रीय कंपनी’ होती. त्यानंतर मधल्या काही वर्षांत मिल्मेट लॅब, गुजरात लायका या कंपन्याचा ताबा त्यांनी घेतला. २०१० ते २०१२ च्या दरम्यान ‘सन फार्मा’ने दुसा फार्मा, तरो फार्मा आणि यूआरएल फार्मा या मोठ्या कंपन्याचा ताबा घेतला. २०१४ हे वर्ष या कंपनीसाठी अतिशय सोनेरी ठरले. याच वर्षी सन फार्माने औषधी क्षेत्रातील मोठी समजली जाणारी कंपनी “रॅनबॅक्सी” हिचा ताबा घेतल्याची घोषणा केली आणि केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेमध्येही या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये जगातील पहिल्या पाच क्रमाकांमध्ये ‘सन फार्मा’ जाऊन बसली. आज औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘सन फार्मा’ जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. जवळपास ५०.००० पेक्षा अधिक लोक या कंपनीत काम करतात. जगभरातील ६ खंडात या कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत. काही वर्षांपूर्वी ‘वेजमन’ या संस्थेच्या सहकार्याने मेंदूच्या आजारावर उपचार व संशोधनात या कंपनीने प्रवेश केला आहे. ‘सन फार्मा’ या कंपनीची आणखी काही उत्पादने ही यूएसच्या अन्न व औषधी प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या फंडामेंटल अॅनालिसिसनुसार जरी भारतीय निर्देशांक महाग असले तरी शेअर बाजारात आगामी काळातील प्रत्येक घसरणीत ‘सन फार्मा’चे शेअर्स प्रत्येक टप्प्याला खरेदी करीत गेल्यास आज केवळ ९४३ रुपये किमतीला मिळणारा हा शेअर पुढील ५ वर्षांचा विचार करता गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. आपण आपल्या लेखमालेत यापूर्वी सनफार्मा ७६४ रुपये किमतीला आणि ४८० रुपयेकिंमतीला असताना खरेदीस योग्य म्हणून सांगितलेला आहे.

ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होत असते त्यावेळी निर्देशांकासोबतच घसरणारे शेअर्सचे भाव बघून आपल्याला भीती वाटायला लागते. आपण अशा घसरणीमध्ये घाबरून जाऊन आपल्याकडील चांगल्या कंपन्यांचे दीर्घमुदतीसाठी घेतलेले शेअर्सदेखील मिळेल त्या किमतीला विकून टाकत असतो. त्यामुळे उत्तम आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शेअर्समध्येही आपण नियोजन आणि अभ्यासाच्या अभावामुळे काही कारण नसताना नुकसान सहन करतो. दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते. अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसिस) तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार विनील इंडिया, एसबीआय लाइफ, पीव्हीआर, कोलइंडिया यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे.

कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७,९६६ या पातळीच्यावर आहे तोपर्यंत कच्चे तेलात आणखी वाढ होऊ शकते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ५१,७९७ ही पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०,१०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. शेअर बाजारात गेले काही महिने उच्चांकापासून मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे त्यामुळे दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली, तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

8 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

10 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

48 minutes ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

1 hour ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

2 hours ago