पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झाला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिले होते. त्याचे उद्घाटन आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र नामांतराच्या वादानंतर पालिकेची अधिकृत परवानगी नसल्याने शिंदे यांच्या हस्ते होणारे हे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे.
शिंदे समर्थक आणि माजी नगरसेवक यांनी महापालिकेच्या जागेवर उद्यान उभारले होते. हे उद्यान त्यांनी स्वखर्चातून उभारले असल्याचा त्यांचा दावा आहे. तीन महिन्यांपुर्वी हे उद्यान उभारण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती मिळताच पुण्यातील काही सामाजिक संस्थांनी आक्षेप घेतला. वैयक्तिक नाव उद्यानाला देता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे हे नाव नियमबाह्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यामुळे प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उद्यानाचे एकनाथ शिंदे हे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आपण विचार करु, असे त्यांनी म्हटले आहे.
हे नाव नियमबाह्य आहे. नाव देण्याची नियमावली असते. पालिकेच्या परवानगीची गरज असते. याची पुर्तता न केल्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आणि उद्यानावरील एकनाथ शिंदे यांच्या नावाचा बोर्ड झाकण्यात आला आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना प्रभागासाठी बजेट आणून विविध विकास कामे केली. त्यांच्या नावावर प्रभावित होवून आणि नागरीकांकडे प्रस्तावर देत या उद्यानाला एकनाथ शिंदेंचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने या उद्यानासाठी निधी उपलब्ध केला नव्हता त्यामुळे मी स्व-खर्चातून हे उद्यान उभारले होते. मात्र आता मी मान्य करतो माझ्याकडून चूक झाली, असे म्हणत प्रमोद भानगिरे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, त्यांच्या दौऱ्याच्या दिवशीच त्यांच्या नावाचा बोर्ड झाकण्यात आल्याने अनेक ठिकाणी चर्चा रंगू लागल्या आहेत.
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…