Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीचा छापा

नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीचा छापा

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने मंगळवारी दिल्ली आणि इतर ठिकाणच्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला. ईडीच्या अधिका-यांनी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात जाऊन कसून शोध मोहीम राबवली. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले.


https://twitter.com/ANI/status/1554355607205220352

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडीने दिल्लीतील नॅशनल हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. दस्तऐवजांच्या शोधात नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर ईडीने छापे मारले. या दरम्यान १० जनपथवर झालेल्या दस्तऐवजांचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांवर छापेमारी होऊ शकते. ईडी सध्या नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या ऑफिस हेराल्ड हाऊसमध्ये छापा मारला.

Comments
Add Comment