मुंबई : राज्यात आज १८८६ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण २१०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण १२५८३ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे ३६६५ इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये १९५५ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील मृत्यूदर हा १.८३ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७८,८९,४७८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के इतके झाले आहे.