अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी ऑपरेशनमधील अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला ठार मारण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच ९/११ हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा झाला. ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. त्यावेळी त्याच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यदेखील उपस्थित होते. मात्र, या हल्ल्यात त्यांना कोणतीही इजा झालेली नसून केवळ जवाहिरी मारला गेला आहे.
अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी हा इजिप्शियन सर्जन होता जो नंतर जगातील सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक बनला. ११ सप्टेंबर २००१ रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणूनही त्याची गणना करण्यात आली होती. त्या दहशतवादी घटनेत सुमारे ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
जवाहिरीवर अमेरिकेने २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. २०११ मध्ये पाकिस्तानात ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर तो अल-कायदावर लक्ष ठेवत असे. न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएन यांनी अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी अमेरिकन सैन्याने देशातून माघार घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील अल-कायदावरील अमेरिकेचा हा पहिला ड्रोन हल्ला आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…