मुंबई : पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत वैद्यकीय चाचणीनंतर पीएमएलए कोर्टात हजर होणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. न्यायालयाच्या परिसरात २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ईडी कार्यालयाबाहेर १०० आणि जेजे रुग्णालयाबाहेर ५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मध्यरात्री मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राऊतांना अटक केली. बुधवारी सात तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली.
राऊतांच्या अटकेनंतर त्यांचा भाऊ सुनील राऊत यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचे सांगितले. अटकेबाबत आम्हाला कोणताही कागद देण्यात आलेला नाही. संजय राऊत यांना भाजप घाबरतो, म्हणून अटक करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.