
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा ईडीने अटक केल्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट करून पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे.
"आता वेळ आली..." (It's Time) असे लिहित नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा फोटो ट्वीट केला आहे. त्यामुळे ईडीची पुढील धाड अनिल परबांवर असेल का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
https://twitter.com/NiteshNRane/status/1553987354943111170
दरम्यान, नितेश राणे यांच्या ट्वीटनंतर भाजपच्या नेत्यांना ईडीची पुढची धाड कुणावर पडणार, हे कसे काय माहिती आहे? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.