कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.१ ने पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून वॉटर एटीएम या प्रकल्पाद्वारे सर्व ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पाद्वारे १ रू.मध्ये १ लिटर शुद्ध पाणी व ५ रू.मध्ये १० लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.
गावातील व्यावसायिकांनासुद्धा या प्रकल्पाचा फायदा झाला आहे. या प्रकल्पास आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन ग्रामपंचायत लोरे नं.१ सरपंच अजय रावराणे व सर्व सदस्यांचे कौतुक केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चीके, तालुका मंडल अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, माजी सरपंच सुमन गुरव, मीडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, गणेश तळेगावकर आदी उपस्थित होते.