Sunday, June 22, 2025

राज्यात ८३० कोरोना रूग्णांची नोंद; एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात ८३० कोरोना रूग्णांची नोंद; एका रुग्णाचा मृत्यू

मुंबई : रविवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. राज्यात आज ८३० कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण १०२४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.


राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा १.८४ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७८,८७,३७२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.


राज्यात एकूण १२८०८ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे ३७३७ इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये १८८९ सक्रिय रुग्ण आहेत.

Comments
Add Comment