Sunday, July 21, 2024

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. ३१ ते ६ ऑगस्ट २०२२

योजना सफल होतील
मेष – पूर्वार्धात ग्रहांचे नैसर्गिक पाठबळ काही अंशी कमी राहिल्याने मिश्र स्वरूपाची फळे प्रतिपादित होण्याची शक्यता आहे. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल. घरासाठी तसेच कुटुंबीयांच्या गरजांसाठी खर्च करावा लागेल. घरातील वापरात असलेली उपकरणे तसेच वाहनांच्या देखभालीच्या खर्चात वाढ होऊ शकते. घरातील भौतिक सुखसुविधा वाढवाल. आपल्या अटी स्वभावावर नियंत्रण ठेवल्यास अनुकूलता वाढेल. कोणत्याही अट्टहासापायी कुटुंब परिवारात तसेच कार्यक्षेत्रात आपली मते इतरांवर लादू नका. कुटुंब परिवारात शुभकार्याची नांदी. तरुण-तरुणींच्या नोकरीविषयक समस्या संपुष्टात येतील.
सतत आर्थिक ओघ राहील
वृषभ – रोजच्या आठवड्यात शुभ ग्रहांची उत्तम साथसंगत लाभत आहे. आपल्या हातात असलेली महत्त्वाची कार्य पूर्ण करण्यासाठी अनुकूल कालावधी तसेच जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता याविषयीची दीर्घ काळ रखडलेली कार्य चांगल्या प्रकारे मार्गी लागतील. त्यामधून आर्थिक लाभाची शक्यता, समाधान मिळेल. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान लाभून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. तरुण-तरुणींच्या समस्या संपुष्टात येतील. काहींना आपल्या मनातील जीवनसाथी निवडता येईल. प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
कर्तृत्व उजळेल
मिथुन – स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आत्मविश्वासाने आपल्या समोरील कामे आपण पार पाडू शकाल. रेंगाळलेली तयारी हातावेगळी करू शकाल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता, वडिलोपार्जित संपत्ती याविषयीची कार्य पूर्ण होतील. अडचणी अथवा समस्या संपुष्टात येतील. नोकरी-व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील, मात्र वसुली करत असताना वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. अति आत्मविश्वास टाळा. सर सलामत तो पगडी पचास हे जाणून आपल्या कार्यक्षेत्रातील निर्णय घेणे आवश्यक ठरेल.
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
कर्क – आजपर्यंत आपण उराशी बाळगलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा कालावधी आहे. शुभ ग्रहांचा पाठिंबा मिळेल. रखडलेली, रेंगाळलेली कार्य हातावेगळी करून मार्गी लागतील. जे जातक स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न बघत होते, अशा जातकांचे स्वप्न साकार होऊ शकते. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक आहे. प्रयत्नांना यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद संपुष्टात येऊन सर्वमान्य तोडगा निघेल. रखडलेल्या अर्धवट अवस्थेतील जमिनी मालमत्तेसंबंधीची कार्य मध्यस्थांमार्फत मार्गी लागू शकतील. कुटुंबात मुलींकडून परिवारात तक्रारी येतील. कुटुंबात वातावरण प्रसन्न राहील.
मोठे यश व प्रसिद्धी
सिंह – सध्याच्या कालावधीमध्ये सकारात्मक राहणे आणि सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे ठरेल. आपल्या आजूबाजूस वेगवान घटना घडू शकतात. आपण आपल्या धाडसाने व आत्मविश्वासाने देणे घ्यावे. विविध क्षेत्रात अनेक स्तरांवर बदल जाणवेल. नोकरी, व्यवसाय, धंद्यात अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत बढती व उत्पन्न होऊ शकते, मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल. कामाच्या स्वरूपात बदल घडून अधिकारात वृद्धी होईल. आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. प्रशंसेस पात्र ठराल.
आनंददायी घटनांचा ओघ
कन्या – अनुकूल स्वरूपाच्या ग्रहमान, यामुळे सदरचा कालावधी आनंददायी ठरू शकतो. काही अविस्मरणीय आनंददायी घटना घडतील. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी-व्यवसायात पुढील मार्गक्रमण प्रगतीकार्य होईल. तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटून अर्थार्जनाचा शुभारंभ होऊ शकेल. चालू नोकरीत पदोन्नती वेतन निवृत्तीची शक्यता आहे. वरिष्ठांबरोबर संबंध सुधारतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आतापर्यंत रखडलेली महत्त्वाची कार्य, जमीन-जुमला संदर्भातील कार्य पूर्ण होतील.
स्पर्धात्मक यश मिळेल
तूळ – कुटुंब परिवारातून वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्यामुळे थोडा ताण-तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. एखादे मंगल कार्य तसेच धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल. कुटुंबात वाद-विवाद निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. भावंडांबरोबर वादविवाद टाळा. स्वभावात चिडखोरपणा डोकावण्याची शक्यता आहे.
बलवत्तर विवाहयोग
वृश्चिक – कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाह ठाण्यातील अडचणी, समस्या दूर होतील. काहींचे परिचयोत्तर विवाह होतील. आत्तापर्यंत चाललेले प्रेमप्रकरण विवाहासारख्या पवित्र बंधनात बंदी होऊ शकते. विरोध संपुष्टात येईल व्यवसाय धंद्यात मोठी संधी उपलब्ध होईल. नव्या भागीदारीविषयी विचारणा होऊ शकते. व्यवसायिक विस्तार करण्यासाठी अनुकूल कालावधी, व्यवसाय-धंद्यात नवीन तंत्रज्ञान तसेच नव्या संकल्पना राबविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशी व्यापाराच्या संधी मिळतील.
सुवार्ता कानी येतील
धनु – शुभ कालावधी. शुभ फळे प्रतिपादित होतील. कुटुंबातील पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो. कुटुंबामध्ये सुवार्तांचा ओघ सतत राहील. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी आल्यामुळे कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. काहींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता येईल. गुरुजनांचे तसेच कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. जे नोकरीच्या शोधात होते, त्यांना नोकरी मिळेल.
आर्थिक नियोजनाची गरज
मकर – सदरच्या कालावधीमध्ये जरा सावध राहूनच आपले कार्य पूर्ण करावे लागेल. आळस झटकून आजचे काम आजच करण्याची गरज आहे. कार्यमग्न राहा. कामात चालढकल टाळणे हितकारक ठरेल. त्याचप्रमाणे आपल्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका तसेच कोणावरही डोळे झाकून अति विश्वास ठेवू नका. महत्त्वाच्या कामात अनपेक्षितरीत्या काही वेळेस समस्या अथवा अडथळा होऊ शकतात. निराश होऊ नका. आत्मविश्वासाने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळेल, कुटुंब परिवारात कोणाशीही वाद-विवाद करू नका.
सकारात्मक घटना घडतील
कुंभ – या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या घटना घटित होऊ शकतात. त्या घटना सकारात्मक राहतात; परंतु अपेक्षित यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. सरकारी कार्य पूर्ण करण्यासाठी विलंब लागू शकतो. त्यामुळे वैतागून न जाता कार्यरत राहणे महत्त्वाचं ठरेल. खर्चात अनपेक्षितरीत्या वाढ होईल; परंतु अंतिमतः सकारात्मक निकाल हातात पडेल. दीर्घकाळ रखडलेली जमिनीची तसेच महत्त्वाची कार्य गतिशील होऊन मार्गस्थ होतील. सरकारी स्वरूपाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच मदत मिळेल व्यवसाय धंद्यातील खर्च वाढू शकतो
शुभग्रहांची साथ-संगत
मीन – अनुकूल कालावधीमध्ये शुभ ग्रहांचा प्रभाव राहून त्यांचे सहकार्य लागेल; परंतु सावध तो समाधानी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अचानक सर्वच क्षेत्रात जबाबदाऱ्यांचे प्रमाण वाढेल, पण आपल्याला झेपतील इतक्या जबाबदारी स्वीकारणे हिताचे ठरेल. कुटुंब परिवारातील एकोपा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. गैरसमजातून कौटुंबिक आप्तेष्ट नातेवाईक यांच्यातील मतभेद वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. पित्तासंबंधी विकार बळावण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुकूलता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -