नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) चे महासंचालक संजय अरोरा यांची दिल्लीचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भात गृह मंत्रालयाने आदेश जारी केला आहे. अरोरा ३१ जुलै २०२५ पर्यंत त्यांच्या पदावर कार्यरत राहतील.
राकेश अस्थाना यांची जागा घेतील. १९८८ च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे आयपीएस संजय अरोरा हे आयटीबीपी चे महासंचालक देखील राहिले आहेत. संजय अरोरा यांनी १९९७ ते २००० या काळात उत्तराखंडमधील मातली इथे आयटीबीपीच्या बटालियनचे नेतृत्व केले आहे.
संजय अरोरा यांनी तामिळनाडू पोलिसांत विविध पदांवर काम केले. ते विशेष टास्क फोर्सचे पोलिस अधीक्षक (एसपी) होते. जिथे त्यांनी वीरप्पन टोळीविरुद्ध महत्त्वपूर्ण यश मिळवले. शौर्याबद्दल अरोरांना मुख्यमंत्री शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे.