बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेत महाराष्ट्राचा खेळाडू संकेत सरगरने शनिवारी यंदाच्या हंगामात भारताला पहिले पदक मिळवून दिले. सांगली जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील संकेत सरगरने रौप्य पदक जिंकले. दरम्यान राज्य सरकारने संकेत सरगर आणि त्याच्या प्रशिक्षकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
रौप्य पदक विजेता संकेत सरगरला ३० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच संकेतचे प्रशिक्षक यांना देखील ७.५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले. सांगली जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील संकेत सरगरने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. संकेतवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच आता महाराष्ट्र सरकारने त्याला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.