डॉ. विजया वाड
विद्यापीठाकडून दुसरी लिस्ट पंधरा दिवसांत आली. वरिष्ठ लिपिक मंजूच्या ओळखीतले असल्याने काम झाले. हे कोणाला ठाऊक नव्हते अर्थात. पण सारी धडपड मंजूची होती. बाबूने आख्ख्या ऑफिसला पार्टीत वडा दिला… बर्फी दिली. गुपचूप, मंजूने मदत केली अर्थात. ते बाबूचे नि मंजूचे गुपित होते. दोघांनाच ठाऊक असलेले. इतक्यात चमत्कार घडला.तीही मार्कलिस्ट जळाली. भुरुभुरु जळाली.हा दुष्टपणा कोण करते?
विद्यापीठ तिसरी लिस्ट देईल?
काय हा हलगर्जीपणा? नियमात बसेल? बाबूला मनात हजार प्रश्न पडले होते. मंजू एवढी निवांत कशी? बाबूला मोठाच प्रश्न पडला. मनातल्या मनात. कुढला, रडला. “बाबू, काळजी करू नको. खरी मार्कलिस्ट माझ्या लॉकरमध्ये सुखरूप आहे.” मंजूने शांतपणे म्हटले. थंडगार झऱ्याखाली सचैल स्नान घडत असल्यागत वाटले बाबूला.
“हे काम शिपायांचे आहे. क्लास फोर टू क्लास थ्री! नो नो! नहीं चलेगा! नहीं परवडेगा!”
मंजू कुजबुजली.
“कोण जळतो माझ्यावर?” बाबू अतिव आश्चर्याने म्हणाला.
“जलनेवाले जला करे! लेकर उनका नाम!
फेक दो दूर दूर आजकी सुंदर शाम!
शामको खराब न करो, समय सुंदर हैं,
यह दुनिया खराब नहीं, दुनिया
तो सुंदर हैं!
देखनेवाले के पास दो सुंदर आँखे हैं,
तो सुंदरताके रूप अनोखे मेले हैं!”
किती सुंदर कवन बाबूचे निर्मळ मन!
मंजूला बाबूचा खूप अभिमान वाटला. इतक्यात सुपरिटेंडेंट आले.
स्वत: अत्युच्च अधिकारी जातीने कार्यालयात येऊन बाबूचे अभिनंदन? बाप रे बाप! बाबूची प्रशस्तिपत्रे लॉकरमधून मंजूने काढली. साहेबांसाठी! ऑफिस चकित! साहेब बोलू लागले, स्टाफशी मनोगत!
“बाबू इज प्रमोटेड टू क्लेरिकल ग्रेड राइट फ्रॉम धिस ब्यूटिफुल मोमेंट. काँग्रॅच्युलेशन्स बाबू. वी आर प्राऊड ऑफ यू. शिपाई लोक, तुम एज्युकेशन कंप्लीट करो. तुम्हारा भला करनेमे ऑफिसको इंटरेस्ट हैं!” बॉस म्हणाले. सारे क्लास फोर कर्मचारी मोहरले. त्यांच्यासाठी बाबू इनस्पिरेशन होता. नवा अध्याय होता प्रगतीचा!
“आयुष्यात केवढे हे प्रगतीस वाव आहे. सौंदर्य केवढे हे… भरुनी उरून राहे” बाबू म्हणाला. टाळ्यांचा कडकडाट झाला.
बाबूच्या कवनाने बॉस अतिशय
खूश झाले.
“ऐसा लडका चाहिये. ऑफिस इज व्हेरी प्राऊड ऑफ यू बाबू. कविता हा माझ्या आयुष्याचा प्राण. कविता जिंवत असेल, तर आयुष्य सुंदर, कमनीय लुभावणारे बनते. अदरवाईज? ड्राय एज एव्हर लाइक अॅन अवजड गद्य!” ऑफीसरने शांतपणे, टाळ्यांच्या अपेक्षेने स्टाफकडे पाहिले. त्यांची निराशा नाही केली स्टाफने.
अपेक्षेप्रमाणे कडाडून टाळी दिली बॉसम् बॉसे बॉसला खूश करून टाकले. बॉस खूशमे
खूश झाला. बर्फी बाबूला स्वहस्ते भरवली.
“एक घास गोडाचा, साहेबांच्या प्रेमाचा एक घास बर्फीचा, क्षण हा सुंदर भाग्याचा”
बाबूने बॉसच्या प्रेमाला पावती दिली. एक शिपाई कविता करतो? ते खासगी ऑफिस क्षणभर मोहरले. मोहाचे झाड झाले.
“बाबू, यू आर अ जिनीयस. यू आर कंफर्टेवली क्लेव्हर. आताच मी तुला हेडक्लार्क का करू नये?”
मंजूच्या छातीत धस्स झाले. कोणावरही इतरांपेक्षा स्वत:वर प्रेम असतेच ना?
बाबू झाला म्हणून काय झाले? शिपाई टू क्लार्कपर्यंत ठीक! त्याला हेडक्लार्कचे पद? नो… नाय… नेव्हर!
पण आले साहेबांच्या मना! तेथे कोणाचे चालेना. बाबूला हेडक्लार्कपदी बढती मिळाली.एका शिपायासाठी तो अत्युच्च भाग्याचा क्षण होता.
(समाप्त)