मुंबई : शनिवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. रविवारी १८४९ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १८५३ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले आहेत.
त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या ७८,८६,३४८ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के झाले आहे. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात २०८७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
आज बी ए. चार आणि पाच व्हेरीयंटचे ६२ रुग्ण आढळून आले. तर बीए. २.७५ चे ७९ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.