Friday, July 5, 2024
Homeक्रीडावेटलिफ्टिंगमध्ये गुरुराज पुजारीला कांस्य पदक

वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराज पुजारीला कांस्य पदक

बर्मिंगहम (हिं.स.) : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या कॉमवेल्थ गेम्समध्ये भारताला आणखी एका पदकाची कमाई झालीय. भाराताच्या गुरुराज पुजारी याने ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. संकेत सरगरने रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर गुरुराजने एकाच दिवशी देशाच्या शिरपेचात दुसरा मानाचा तुरा रोवला आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत शनिवारी भारताच्या गुरुराज पुजारी याने ६१ किलो वजनी गटात २६९ किलोग्राम वजन उचलून कांस्य पदक पटकावले. संकेत सरगरने रौप्य पदक मिळवले असतानाच गुरुराजने ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकत देशाची मान उंचावली आहे.

गुरुराजने क्लीन अँड जर्कमध्ये ११८ किलोग्राम वजन उचलले. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये १५१ किलोग्राम वजन गुरुराजने उचलत चांगली आघाडी घेतली. त्यामुळे त्याने एकूण (११८ १५१) २६९ किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा पदकासाठी प्रयत्न केला. पण अखेरच्या गुणतालिकेत तो तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -