Sunday, June 22, 2025

चंद्रपूरात वीज पडून चार महिला ठार

चंद्रपूर (हिं.स.) : वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथे शेतात वीज पडून चार महिला ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी दुपारी घडली. यामुळे खळबळ माजली आहे.


वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांच्या शेतात त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य हिरावती शालिक झाडे (४५), पार्वतीबाई रमेश झाडे (५५), मधुमती सुरेश झाडे (२०),रीना नामदेव गजभे (२२) शेतात काम करीत होत्या.


त्यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाचा आधार घेतला. पण त्याच झाडावर वीज पडल्याने यात यात त्या ४ महिलांचा मृत्यू झाला. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment