Friday, July 11, 2025

अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली!

अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२२) ही अर्थव्यवस्था गडगडली असून तिच्यामध्ये ०.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील ही सलग दुसरी घट आहे. ही अवस्था आगामी काळात मंदीचे संकेत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


युएस ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अॅनालेसिसच्या (बीईए) माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीत १.६ टक्क्यांनी घट झाली होती. त्यानंतर पुन्हा एप्रिल ते जून या तिमाहीतही जीडीपीत घट झाल्याने ही तांत्रिक मंदीची नांदी असल्याचे सूचित करत आहे.


https://twitter.com/ani_digital/status/1552862612320243712

रिअल जीडीपीत घट दिसून येणे याचा अर्थ खासगी संस्थांची गुंतवणूक, रेसिडेन्शिल फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट, अमेरिकन सरकारचा महसूली खर्च, राज्ये आणि स्थानिक सरकारांचा महसुली खर्च तसेच नॉन रेसिडेन्शिअल फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट यांच्यामध्ये काही प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबर निर्यात आणि वैयक्तिक खर्चात वाढ झाल्याने जीडीपीत घट नोंदवली गेल्याच बीईएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment