Tuesday, July 23, 2024
Homeकोकणरायगडपेणच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राख्यांना विशेष मागणी

पेणच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राख्यांना विशेष मागणी

पेण (वार्ताहर) : पेणमधील ‘आय डे केअर’ संस्थेच्या दिव्यांग अशा विशेष मुलांनी आपल्या कला कौशल्याने रक्षाबंधन सणानिमित्त हजारो आकर्षक राख्या बनवल्या आहेत. यामध्ये मण्यांच्या राख्या, कॉटन दोरा राख्या, कागदी- फिलिंग राख्या, लोकर, गोंडा राख्या तयार करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांकडून वर्षभरात आठ ते दहा हजार राख्या बनविल्या जातात. या राख्यांना विदेशातही मागणी असते, तर सीमेवरील जवानांनादेखील या राख्या पाठविल्या जातात.

या दिव्यांग विद्यार्थ्यांकडून फुलझाडांच्या बियांपासून बीजबध राख्या तयार केलेल्या पहायला मिळत आहेत. या राख्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, बेंगलोर, कर्नाटक, चंद्रपूर, चंदिगड आदी राज्यांसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा विदेशातही पाठवल्या जातात. तसेच सीमेवरील भारतीय सैनिकांना देखील या वर्षी ५०० राख्या पाठवण्यात आल्या आहेत. यंदाचा रक्षाबंधन सण जवळ आल्याने हे विद्यार्थी राख्या बनविण्यात मग्न आहेत. याचबरोबर विद्यार्थी कापडी पिशवी, बुके, कापडाची फुले, टूब्लेक्स पेपरची फुले, आकाश कंदील, साबण, दिवे, पणत्या, शोभेच्या वस्तू आदी प्रकारचे साहित्य बनवतात.

या शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देण्याचे काम गेल्या ११ वर्षांपासून संस्थेच्या संस्थापक स्वाती महेंद्र मोहिते या करीत आहेत. तसेच यामध्ये उपाध्यक्षा डॉ. शिल्पा ठाकूर, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील, उपमुख्याध्यापिका विद्या खराडे, विषेश शिक्षक शिल्पा पाटील, निशा पाटील, रामचंद्र गावंड, अक्षता देवळे, दिव्या ठाकूर या सर्वांची विशेष मेहनत दिसून येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -