Friday, October 24, 2025
Happy Diwali

भारताचा पाकला पंच; शिवा थापाचा सुलेमानवर दणदणीत विजय

भारताचा पाकला पंच; शिवा थापाचा सुलेमानवर दणदणीत विजय

बर्मिंगहम (वृत्तसंस्था) : कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२च्या पहिल्याच दिवशी भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. बॉक्सिंगच्या पहिल्याच फेरीत भारताच्या शिवा थापाने पाकिस्तानच्या सुलेमानचा दारूण पराभव केला.

पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानवर मिळविलेला विजय भारतीयांना वेगळाच आनंद देऊन जातो. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी देशातील क्रीडा चाहत्यांना हा आनंद मिळवून दिला तो बॉक्सिंगपटू शिवा थापाने. शिवा थापाने पहिल्याच फेरीत पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा दारूण पराभव करत स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली.

शिवा थापाने सुलेमानचा ५-० असा दारूण पराभव करत विजय सलामी दिली. शिवा थापाच्या या दमदार कामगिरीमुळे भारताच्या बॉक्सिंग वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. देशातील अनेक क्रीडा चाहत्यांनी शिवा थापाचे कौतुक करत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >