Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपालघर पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’

पालघर पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’

२५४ वाहनधारकांवर गुन्हे दाखल,  २३ फरार आरोपींना अटक

३४ महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

पालघर (वार्ताहर) : पालघर पोलीस दलाकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवण्यात आले. या अंतर्गत सोळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये ३४ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करून तसेच गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या २३ वस्त्यांमध्ये एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात अनेक गुन्हेगारांना अटक करून काही मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह ५० पोलीस अधिकारी ३३२ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.

या अभियानांतर्गत मालमत्ताविरुद्ध दाखल गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या तसेच २५४ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, २३ पाहिजे असलेल्या आरोपींना अटक केली, दारूबंदी कायद्याप्रमाणे ३० गुन्हे दाखल करण्यात आले, तर १२५ निगराणी बदमाशांची एकाच वेळी तपासणी करण्यात आली. हे ऑपरेशन काल रात्री ते आज सकाळपर्यंत राबवण्यात आले.

दारूबंदी कायद्याखाली ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून एक लाख ७२ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर जुगारासंदर्भात दोन गुन्हे दाखल करून सात हजार चारशे दहा रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तसेच २५४ वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख दहा हजार आठशे रुपये किमतीचा दंड वसूल करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -