मुंबई (हिं.स.) : मुंबईतील शिवाजी नगरच्या बैंगनवाडी परिसरात एका घरामध्ये चार जणांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.
शकील जलील खान (वय ३४), राबिया शकील खान (वय २५), सरफ़राज़ शकील खान (वय ७) आणि अतिफा खान (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
मुंबईच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रस्ता क्रमांक १४ बैंगनवाडी या वसाहतीत हा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. ही आत्महत्या आहे की, हत्या याचा तपास पोलीस करत आहेत. हे चारही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राजावाडी शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आले आहे.