मुंबई विमानतळाजवळील ४८ इमारती पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

  89

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या ४८ टोलेजंग इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे.


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या इमारतींबाबत हे आदेश आहेत. या इमारतींचे ते भाग पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, ज्यांची उंची परवानगी मर्यादेपेक्षा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आदेशाचे पालन करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ उंच इमारतींचे भाग तातडीने पाडण्याचे आदेश दिले आहेत.


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक उंचीपेक्षा जास्त बांधकाम केलेले भाग पाडण्यात येणार आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर थोपवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांवर ताशेरे ओढले. तसेच, या धोकादायक इमारतींबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असेही सांगितले. ज्या इमारतींना उंचीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे, त्या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही न्यायालयाने अधिकाऱ्यांना केली आहे.

Comments
Add Comment

'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ड्रग तस्करी प्रकरणी अटक केलेल्यांवर मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री

उबाठानेच केला मराठीचा घात, शिवसेनेची बॅनरबाजी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा पहिलीपासून शाळेत सक्तीच्या

पुढील शंभर वर्षांचा विचार करुन प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करा; अजितदादांची अधिका-यांना तंबी

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला

महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका मुंबई : दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

'पुण्ये अशी येती फळाला' : बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मुंबई : भाजपा पक्ष संघटनेत फेरबदल झाले असून रविंद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. चव्हाण यांच्या

बीडमधील लैंगिक शोषणाची होणार एसआयटी चौकशी

मुंबई : बीड येथील शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या