मुंबई : शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ४०० हून अधिक अंकांनी उसळी घेत ५७,२५८.१३ वर सुरुवात केली. तर निफ्टीही ४९.९० अंकांनी वधारले. बाजार सुरु होताच निफ्टी १७,०७९.५० वर पोहचला.
शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली. बाजार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने घोडदौड सुरु केल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स ६०३ अंकांनी वधारला, तर निफ्टीनेही १८७ अंकांनी उसळण घेत १७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे.