बर्मिंगहॅम (हिं.स.) : आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिकाने दक्षिण आफ्रिकेच्या मुशफिकुह कलामचा ११-५ असा पराभव केला.
महत्वाचे म्हणजे मनिका बत्रा पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळत आहे. तर दुसरीकडे महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुला या भारतीय जोडीने देखील दमदार कामगिरी केली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिशा पटेलला पराभूत केले. टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्राने मुशफिकुह कलामचा ११-५ अशा फरकाने पराभव केला.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मनिकाने प्रतिस्पर्धी खेळाडू मुशफिकुह कलामवर पूर्णपणे वर्चस्व मिळवल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी करत मुशफिकुहला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दुसरा सेटही मनिकाने एकतर्फी जिंकला.