
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र संरक्षणासाठी कार्य करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, “आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त, व्याघ्र संरक्षणासाठी सक्रीय असणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. भारतात ७५,००० चौरस फुटांपेक्षा अधिक भूक्षेत्रावर ५२ व्याघ्र प्रकल्प वसलेले आहेत, ही बाब निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. व्याघ्र संरक्षणात स्थानिक समाजाला सहभागी करून घेण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत.”
https://twitter.com/narendramodi/status/1552932436803481600