मुंबई (हिं.स.) : राज्यात आज १९९७ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज एकूण १३१८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज २४७० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७८,८२,२३६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९९% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३१,००,९३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,४३,५१९ (०९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचे ४ रुग्ण तर बी ए.२.७५ चे ३२ रुग्ण
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए.५ चे ४ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ३२ रुग्ण आढळले आहेत.
यातील २३ रुग्ण नागपूर येथील, ११ यवतमाळ आणि २ वाशिम येथील आहेत.
या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या १९६ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या १२० झाली आहे.
जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ :
पुणे -१०१, मुंबई -५१, ठाणे – १६, रायगड – ७, सांगली-५, नागपूर -८, पालघर – ४, कोल्हापूर -२.
जिल्हा निहाय बी ए.२.७५ :
पुणे -५६, नागपूर -३३, यवतमाळ -१२, मुंबई -५, अकोला – ४, ठाणे -३, वाशिम -२, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी १.