पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात असणाऱ्या पूना हॉस्पिटलजवळ गटारी पार्टी करत असताना अचानक वाद सुरु झाला आणि त्यानंतर एका तरुणाची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार बारक्या दोरी या आरोपीचा तीक्ष्ण हत्याराने खून केला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतकावर कोयत्याने वार केल्याच्या खूना आहेत. मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांकडून तपास सुरु आहे.