मुंबई : काही दिवसांपूर्वी गजाजन किर्तीकर यांच्यासह दोन वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली. डाके हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुरुवातीपासूनचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यानंतर आता शिंदे मनोहर जोशींच्या भेटीला जाणार असून संध्याकाळी पाच वाजता ही भेट असेल.
एकनाथ शिंदेंच्या जुन्या नेत्यांच्या भेटीमागील प्रमुख कारण म्हणजे या नेत्यांनी आपल्या बाजून करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. आता ज्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत शिवसेना वाढवली त्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांच्या एकनाथ शिंदे भेटी घेत आहेत. आम्ही अद्यापही जुन्या नेत्यांना विसरलेलो नाही त्यांच्या गाठीभेटी घेत आहोत आणि त्यांची विचारपूसही करत आहोत, हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.